कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कार-घर गिफ्ट देणारे हिरे व्यापारी महेश सवानींचा AAPमध्ये प्रवेश
रविवारी सूरतमधील हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ला पराभूत करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल आहे, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी महेश सवानी यांचं पक्षात स्वागत केलं.
सूरत: दिल्लीमध्ये केलेल्या सत्तास्थापनेनंतर आता आम आदमी पार्टी (AAP) गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. आज रविवारी सूरतमधील हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ला पराभूत करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल आहे, असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी महेश सवानी यांचं पक्षात स्वागत केलं.
मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'गुजरातमधील यशस्वी उद्योगपती आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. महेश भाई आपलं परिवारात स्वागत आहे. गुजरातचं राजकारण आता एक वेगळं वळण घेईल. सूरतमधील पत्रकार परिषदेत मनीष सिसोदिया म्हणाले की, आप गुजरातमध्ये एका मोकळ्या भूखंडासारखा आहे. ज्यावर राज्याच्या नवीन आणि आधुनिक राजकारणाचं घर बनवलं जाऊ शकतं. या इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी आपमध्ये महेश सवानी यांचं स्वागत आहे. सिसोदिया म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टी चौफेर वेगाने वाढत आहे.
कर्मचाऱ्यांना कार-घर गिफ्ट करण्यासह सामाजिक कामांसाठी ओळखले जातात महेश सवानी
प्रत्येक वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना कार-घर गिफ्ट करण्यासह सामाजिक कामांसाठी महेश सवानी ओळखले जातात. सवानी यांनी आजवर अनेक मुलींची लग्न देखील लावून दिली आहेत. यामुळं सवानी यांचं नाव गुजरातसह देशभरात चर्चेत आहे.
महेश सवानी कोण आहेत...
गुजरातच्या भावनगरमधील एका गावातून महेश सवानी यांचे वडील 40 वर्षांपूर्वी सूरतला आले. त्यांनी हिरे पॉलिश करण्याचं काम सुरु केलं. ते काम हळू हळू वाढल आणि ते एका यूनिटचे मालक झाले. सवानी यांचं कुटुंब दरवर्षी गरीब मुलींची लग्न लावून देतं.
गुजरातमधील नगरपालिका निवडणुकांमध्ये 120 पैकी 27 जागा जिंकून आपनं गुजरातमधील विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचं AAPचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं.