Dilip Chhabria ED Inquiry: प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया ईडीसमोर हजर, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू
Dilip Chhabria Money Laundering Case: डीसी मोटर्सचे (DC Motors) मालक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) हे आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत.
Dilip Chhabria Money Laundering Case: डीसी मोटर्सचे (DC Motors) मालक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) हे आज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत. ईडीने छाब्रिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी याशीच संबंधित प्रकरणी त्यांची चौकशी करत आहे.
Dilip Chhabria of DC Motors appeared before ED today in the money laundering case against him. He is being questioned pic.twitter.com/xUuLZ4GLnn
— ANI (@ANI) August 22, 2022
ईडीने मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट, ईओडब्ल्यूने छाब्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांवर साल 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्याने दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापेमारी देखील केली होती.
मुंबई पोलिसांनी केली होती अटक
दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कथित ग्राहक बनून कर्ज घेतल्याचं आढळून आल्याने मुंबई पोलिसांनी 28 डिसेंबर 2020 रोजी छाब्रिया यांना अटक केली होती. दिलीप त्यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन सीआययूनं तर एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.
काय आहे प्रकरण?
छाब्रिया यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोप केला आहे की छाब्रिया यांनी काही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनच्या अधिकार्यांशी संगनमत करुन त्यांच्या कंपनीकडून कार खरेदी केलेल्या ग्राहकांच्या नावांचा बेकायदेशीरपणे वापर करुन कोट्यावधींचं रुपयांचं कर्ज घेतलं. हे कर्ज फेडण्यात छाब्रिया अयशस्वी ठरले, त्यामुळे त्यांचा मुलगा, बहीण आणि एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे.