एक्स्प्लोर
बंगळुरुमध्ये आढळली 2 हजाराची पहिली बनावट नोट!
बंगळुरु : नव्या नोटांची नक्कल शक्यच नाही, असा दावा करणाऱ्या सरकाला जबर तडाखा बसला आहे. कारण कर्नाटकातल्या चिकमंगळूरमध्ये दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
चिकमंगळूरमध्ये एका व्यापाऱ्याने बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून धरपकड सुरु केली. या कारवाईत काही नोटा जप्त करण्यात आल्या. त्यावेळी या नोटा कलर झेरॉक्स असल्याचं समोर आलं.
दोन हजाराची नवी नोट लोकांच्या हाती पडून दोन दिवसही झाले नाहीत. तोच दोन हजाराची बनावट नोट तयार करण्याचा सपाटाही सुरु झाल्याने चिंता वाढली आहे. या प्रकरणी चिकमंगळूर पोलिसांनी 420 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement