एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
पाकिस्तानची सरकारी वाहिनी असलेल्या पीटीव्ही न्यूजकडून दोन वर्षापुर्वीची ओदिशामधील एका विमान अपघाताची जुनी छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.
मुंबई : भारताच्या हद्दीत शिरलेल्या तीन विमानांनी भारताचं विमान पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. मात्र पाकिस्तानचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. पाकिस्तानी मीडियावर सध्या खोट्या बातम्यांचा पाऊस सुरु आहे. पाकिस्तानची सरकारी वाहिनी असलेल्या पीटीव्ही न्यूजकडून चार वर्षापुर्वीच्या ओदिशामधील एका विमान अपघाताची जुनी छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.
आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हवाई हद्दीत शिरली होती. त्यानंतर भारतीय वायु दल सज्ज झाल्यानंतर या विमानांनी पळ काढला. भारतीय वायुसेनेनं यापैकी एक एफ-१६ विमान पाडल्याचं सध्या वृत्त आहे. पाकिस्तानकडून देखील भारताचं विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ते पटवून देण्यासाठी त्यांच्याकडून जुन्या छायाचित्रांचा आधार घेण्यात येत आहे. पीटीव्ही न्यूजने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ओदिशामधील अपघातग्रस्त विमानाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
भारताच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांची तातडीची बैठक | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement