एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारचा नोकरदारांना दणका, पीएफ व्याजदरात कपात
पीएफचं व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
नवी दिल्ली : सरकारने नोकरदारांना दणका दिला आहे. ईपीएफओने पीएफवरचं व्याजदर 8.65 टक्क्यांहून 8.55 टक्के केलं आहे. चालू वर्षातील या बदलामुळे पीएफवर मिळणाऱ्या व्याजात आता कपात होणार आहे. परिणामी नोकरदारांच्या खिशाला याची झळ बसेल.
पीएफवरचं व्याजदर घटवून ते 8.55 टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आणि पीएफ अकाऊंटच्या व्याजदरात कपात केली, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली.
पीएफचं व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. 2015-16 साली 8.8 टक्के व्याजदर होतं आणि आता ते 2017-18 साठी 8.55 टक्क्यांवर आलं आहे.
दरम्यान, चालू वर्षातील व्याजदर 8.65 टक्के कायम ठेवण्यासाठी ईपीएफओने एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफमध्ये आपल्या गुंतवणुकीचा एक भाग याच महिन्यात 2886 कोटी रुपयांमध्ये विकला होता. ज्यामुळे व्याजदर 8.65 टक्के ठेवलं जाणार होतं. मात्र यामध्ये बदल करण्यात आला.
सध्या सरकारने अनेक छोट्या बचत योजनांचं व्याजदर कमी केलं आहे. त्यामुळे छोट्या योजनांमधील गुंतवणूक आता पहिल्यासारखी फायदेशीर राहिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement