एक्स्प्लोर
पगारदारांसाठी आनंदाची बातमी, ईपीएफच्या व्याजदरात वाढ
आर्थिक वर्ष 2018-19 साठी 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण साडे पाचकोटी पगारदारांना याचा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनाने (ईपीएफ) प्रॉव्हिडंट फंडच्या (पीएफ) व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण साडे पाचकोटी पगारदारांना याचा फायदा होणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. आता चालू वर्षाच्या पीएफवर 8.65 व्याजदर मिळणार आहे. 2016 वर्षानंतर पहिल्यांदाच पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत पीएफवर 8.55 टक्के व्याजदर मिळत होता.
कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक पार पडली. व्याजदर वाढीच्यासंदर्भात सीबीटी शिफारस करतो. या शिफारसीवर श्रम मंत्रालय विचार करुन अंतिम रुप देतो. त्यानंतर ईफीएफ बोर्डच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाला मान्यतेसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येते.BREAKING: EPF की ब्याज दरों में बढ़ोतरी की गई है और इसे 8.55 प्रतिशत से बढ़ाकर 8.65 फीसदी कर दिया गया है. 5.5 करोड़ अंशधारकों के लिए ये बड़ी खुशखबरी है. pic.twitter.com/t8LB64PJBT
— ABP न्यूज़ हिंदी (@abpnewshindi) February 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement