एक्स्प्लोर

पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी

मुंबई :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे कल हाती आले आहेत. बहुतेक ठिकाणी एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच निकाल लागला.   पाच राज्यांचा निकाल   प. बंगाल (एकूण 294) : तृणमूल काँग्रेस: 211, डावी आघाडी - (डावे 32 + काँग्रेस 44), भाजप: 3, अन्य: 4   तामिळनाडू (एकूण 234):  जयललिता (एआयएडीएमके) +: 134, करुणानिधी + काँग्रेस =97 (डीएमके 89, काँग्रेस 8)  भाजप: 0, अन्य: 1   आसाम (एकूण 126) : भाजप 60 + एजीपी 14 +बीपीएफ 12 = 86, काँग्रेस+: 26, AIUDF: 13, अन्य: 1   केरळ (एकूण 140) - डावी आघाडी+: 85, काँग्रेस+: 46, भाजप+: 1, अन्य: 8        पद्दुचेरी (एकूण 30) - काँग्रेस+: 17, AINRC: 8,  एआयएडीएमके: 4, अन्य: 1   पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची जादू   पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे. 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवला.   तर यावेळीही सत्ता मिळवण्यात डाव्या आघाडीला अपयश आलं आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 32, तर काँग्रेसला 44 म्हणजे दोघांना मिळून  76 जागांवरच विजय मिळवता आला.   प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच तुलनेने मोठं यश मिळवलं आहे. भाजपला 3 जागांवर विजय मिळवता आला.   तामिळनाडूत अम्मांनी इतिहास रचला   पश्चिम बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जींनी सत्ता टिकवली, तसंच तामिळानाडूत जयललितांच्या 'ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात अण्णा द्रमुकने (AIDMK) इतिहास रचला आहे. 234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने तब्बल 134 जागांवर विजय मिळवला. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे.   दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या 'द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात DMK ला 89 तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवता आला. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.   तामिळनाडूत 1984 नंतर कोणत्याही सरकारने सलग दोनवेळा सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे.   केरळमध्ये डाव्यांची काँग्रेसला धोबीपछाड   केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड केलं आहे. 140 जागा असलेल्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे.  इथे डाव्या आघाडीने 85 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला  46 जागाच जिंकता आल्या.   दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे.   आसाममध्ये इतिहास घडला, भाजप सत्तेवर   पूर्वेकडील राज्य आसामध्ये भाजपने इतिहास रचला आहे. कारण आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवलं आहे. 126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून  तब्बल 86 जागा जिंकल्या.   भाजप, असाम गणपरिषद आणि बोडो पिपल्स फ्रंट यांनी एकत्र येत निवडणूक लढवली आहे.   दुसरीकडे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ 26 जागांवरच विजय मिळवता आला.   तर 'ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट' अर्थात AIUDFने  13 जागा जिंकल्या. याशिवाय अपक्ष व इतर 1 जागांवर विजय मिळवला.   पुद्दुचेरीत कोणाची बाजी? केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी एआयएनआरसीचे  एन रंगासामी यांना मुख्यमंत्रिपद टिकवण्यात अपयश आलं.   पुद्दुचेरीत करुणानिधींच्या द्रमुक आणि काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. या आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आलं.  या आघाडीला 17 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी एआयएनआरसीला 8, जयललितांच्या एआयडीएमकेला 4 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली.   यंदाच्या निवणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवून चौथ्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न एन रंगासामी पाहत होते. मात्र  त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही.   30 जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेसाठी 16 मे रोजी मतदान झालं होतं. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये 344 उमेदवारंचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. यामध्ये 96 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. पुद्दुचेरीत 9.41 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  

संबंधित बातम्या

हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर

पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी

प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता

तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत

एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?

ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?

महत्त्वाच्या बातम्या

भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Embed widget