Earthquake in India Live Updates: दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात भूकंपाचे तीव्र झटके
Earthquake in India Live Updates: : जम्मू-काश्मीरपासून दिल्ली एनसीआरपर्यंत काल रात्री भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं आणि याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे
LIVE
Background
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरपासून दिल्ली एनसीआरपर्यंत भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. भूकंपाचं केंद्र ताजिकिस्तान होतं आणि याची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे झटके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि चंदिगढ या राज्यातही जाणवले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये 7.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेनं 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंप आला. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीनुसार, अमृतसर (पंजाब) मध्ये रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे.
भूकंपशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, "उत्तर भारतामध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती आणि याचं केंद्र पंजाब येथील अमृतसर हे होतं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करुन लोकंच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.