Electromagnetic Railgun : भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार; शत्रूला धडकी भरवणाऱ्या प्राणघातक तोफेचे काम सुरु
Electromagnetic Railgun : या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनमध्ये गनपावडरऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वापरण्यात येणार आहे.
Electromagnetic Railgun : तंत्रज्ञानाच्या या युगात आता जगभरात लष्कर आणि शस्त्रास्त्रेही आधुनिक होत आहेत. भारतात, हे काम DRDO (Defence R & D Organisation) द्वारे केले जाते. डीआरडीओने आता भविष्यातील शस्त्रांवर जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन (तोफ) (Electromagnetic Railgun) बनवण्यास सुरुवात केली आहे. या तोफेचे वैशिष्टय म्हणजे ती 200 किमी अंतरावरून स्फोटकांशिवाय गोळीबार करू शकते.
या रेलगनमध्ये गनपावडरऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वापरण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये विद्युत प्रवाहाद्वारे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार केले जाते. त्यामुळे रेलगनमध्ये असलेली गोळी ध्वनाच्या वेगापेक्षा 6-7 पट अधिक वेगाने बाहेर येते.
डीआरडीओने ट्विट करून दिली माहिती
#DRDO is working on 100MG Rail Gun
— Indian Aerospace Defence News (IADN) (@NewsIADN) October 4, 2022
Electromagnetic Railgun (EMRG) powered by 10 MJ capacitor has already been developed as a testbed to develop 100MG #RailGun. (1/n)#IADN pic.twitter.com/MO2fQsnhpp
या तोफेचे वैशिष्टय म्हणजे यात गनपावडरचा वापर केला जात नसून ती फायर करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर करण्यात आला आहे. DRDO ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुण्यातील त्यांच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) प्रयोगशाळेत यावर काम सुरू झाले आहे. भू, नौदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी हे भविष्यातील महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.
वैशिष्ट्ये काय असतील?
ही रेलगन बनवल्यानंतर बंदुकांचा वापर कमी होईल, असे बोलले जात आहे. तोफांची रेंज 50 ते 60 किमी आहे, तर रेलगन 200 किमीपर्यंत मारा करू शकते. म्हणजेच सीमेपासून दूर बसूनही त्याचा वापर शत्रूंवर करता येऊ शकतो. पारंपारिक आणि अत्याधुनिक अशी दोन्ही शस्त्रे त्याच्या रेंजमध्ये येऊ शकतात. ही रेलगन जमिनीवरील तळ उद्ध्वस्त करू शकते तर दुसरीकडे शत्रूंचे क्षेपणास्त्र हल्लेही थांबवू शकते. समुद्रात ती युद्धनौकांना लक्ष्य करू शकते, तर आकाशात शत्रूच्या विमानांना नष्ट करू शकते. याचाच अर्थ आतापर्यंत ज्या कामांसाठी लहान क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे, ते काम भविष्यात या रेलगन करतील.
कोणाकडे हे शस्त्र आहे?
हे शस्त्र भारतासह अमेरिका, रशिया आणि चीन या अस्त्रावर काम करत आहेत. अमेरिकेने यापूर्वीच त्याची चाचणी घेतली आहे. याची चाचणी भारताने देखील यापूर्वीच घेतली आहे. मात्र, या शस्त्रावर अजून काम व्हायचे आहे.
महत्वाच्या बातम्या :
दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं