'जिथे शेतकरी अडचणीत असेल तिथे सरकार त्यांच्या पाठीशी'; कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर भारती पवारांची पहिली प्रतिक्रिया
Dr Bharti Pawar : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dr Bharti Pawar नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा (Onion Export Ban Lift) निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानते. ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अमित शाह यांच्यासोबत आज मीटिंग झाली होती. त्यानंतर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोयाबीनसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी
त्या पुढे म्हणाल्या की, कांद्याच्या प्रश्नासाठी मी कायम केंद्रीय नेत्यांची मदत घेतली आहे. आमचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात आम्ही कांदा खरेदी केलेला आहे. इतर देशात कांद्याची मागणी आहे. त्यामुळे निर्यात झाली की, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जिथे शेतकरी अडचणीत असेल तिथं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल. सोयाबीनसाठी देखील आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असेही भारती पवार म्हणाल्या.
तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी
दरम्यान, सरकारने कांदा निर्यातीवर परवानगी दिली असली तरी, त्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने परवानगी दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये 50 हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.
कांद्याचा पुरेसा साठा
गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सरकारविरोधात शेतकरी झाले होते आक्रमक
केंद्र सरकारने 8 डिसेंबर कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी करण्यात आली होती. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी सुरु राहणार होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतला होता.
आणखी वाचा