Unnao Road Accident: डबल डेकर बसची दुधाच्या कंटेनरला जोरदार धडक; 18 प्रवासी जागीच दगावले, 30 हून अधिक गंभीर जखमी
Unnao Road Accident: बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डेबल डेकर बसला बुधवारी सकाळी अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, 18 जणांचा या अपातात मृत्यू झाला आहे.
Unnao Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) झालेल्या भीषण अपघातानं (Accident) देश पुरता हादरला आहे. उन्नावमध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उन्नावमधील एक डबल डेकर बस दुधाच्या डब्यात घुसल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात बस दुधाच्या कंटेनरवर आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Uttar Pradesh | Several injured after a sleeper bus going from Sitamarhi in Bihar to Delhi rammed into a milk container under Behtamujawar PS on the Lucknow-Agra Expressway in Unnao. Police reached the spot. Further details awaited.
— ANI (@ANI) July 10, 2024
बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डेबल डेकर बसला बुधवारी सकाळी अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, 18 जणांचा या अपातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि दुधाच्या कंटेनरला जाऊन धडकली, त्यानंतर हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, खूप मोठा आवाज झाला. आवाजानं आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सर्व जखमी रुग्णालयात दाखल
लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गढा गावासमोर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून कांहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
उन्नावचे पोलिस अधीक्षक, क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ आणि इतर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. बसचा क्रमांक UP95 T 4720 असून दुधानं भरलेल्या कंटेनरचा क्रमांक UP70 CT 3999 आहे. मृतांमध्ये 14 जणांची ओळख पटली आहे. तर, इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.