Domestic Natural Gas Prices Hike: देशात पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीनंतर सीएनजी आणि पीएनजी महाग होऊ शकते. कारण घरगुती गॅसच्या (Domestic Gas Price) किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. 1 एप्रिल 2022 पासून देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किमती 6.10 डॉलर्स प्रति एमएमबीटीयूने वाढल्या आहेत. नवीन किंमत 1 एप्रिलपासून सहा महिन्यांसाठी लागू असेल. सध्या घरगुती नैसर्गिक वायूची किंमत 2.9 डॉलर्स प्रति एमएमबीटीयू आहे.
गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे एप्रिल महिन्यापासून स्वयंपाकघर ते वीज आणि वाहतूक खर्च वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने गॅसच्या किमती वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना संकटानंतर गॅसची मागणी वाढली, मात्र त्या प्रमाणात उत्पादन वाढले नाही. त्यामुळे गॅसच्या किमती वाढल्या आहेत. आयातित एलएनजीसाठी देशांतर्गत उद्योजक आधीच अधिक किंमत मोजत आहेत. महागड्या एलएनजीमुळे रिफायनरीज आणि वीज कंपन्या अडचणीत वाढल्या आहेत.
दरम्यान, एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात दर सहा महिन्यांनी गॅसच्या किमतींचा आढावा घेतला जातो. नैसर्गिक वायूच्या किमती प्रति युनिट 2.9 डॉलर्स वरून 6.1 डॉलर्स प्रति युनिट पर्यंत वाढल्या आहेत. नैसर्गिक वायूच्या किमतीत एक डॉलरने वाढ झाली, तर सीएनजीची किंमत प्रति किलो 4.5 रुपयांनी वाढते. अशाप्रकारे सीएनजीच्या किमतीत 15 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे वीजेपासून घरांना पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किमतीही वाढणार आहेत. तसेच सरकारवर खत अनुदानाच्या बिलावरील खर्चाचा बोजाही वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Narendra Modi : ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त, राज्यसभा सदस्यांच्या निरोपावेळी पंतप्रधानांचे वक्तव्य
- Russia Offer to India : रशियाने भारताला दिली खास ऑफर, अमेरिकन निर्बंधही होतील निष्प्रभ
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची आता अंमलबजावणी होणार 'FASTER'! तुरुंग-तपास यंत्रणेपर्यंत लवकर पोहोचणार आदेश