Russia Offer to India : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर निर्बंध लागू केले. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठीही अमेरिका आणि युरोपीयन देशांनी मोठे निर्णय घेतले आहे. भारत आणि रशियामधील व्यापाराच्यादृष्टीने रशियाने मोठा प्रस्ताव दिला आहे. भारताला रशियाकडून शस्त्राशस्त्रे आणि कच्चे तेल हवे आहेत. त्या अनुषंगाने रशियाने दिलेला प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाची मेसेजिंग सिस्टीम SPFS वापरून रुपी-रुबल डिनोमिनेटेड पेमेंटचा समावेश आहे. भारताने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आजपासून दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. 


भारताला हवाय द्विपक्षीय व्यापार


अत्याधुनिक शस्त्राशस्त्रे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने भारताला रशियाकडील कच्चे तेल हवे आहे. त्यामुळे भारताला रशियासोबत द्विपक्षीय व्यापार सुरू ठेवायचा आहे. तर, दुसरीकडे अमेरिकन निर्बंधानंतर आर्थिक कोंडी काही प्रमाणात कमी करण्यासाठी रशियादेखील प्रयत्नात आहे. 


नवी प्रणाली कशी काम करणार?


सूत्रांनी सांगितले की, रशियाने दिलेल्या प्रस्तावानुसार, रशियन चलन रुबल भारतीय बँकेत जमा केले जातील. त्याचे चलन विनिमय होऊन रुपयात बदल होतील. अशाच प्रकारे रुपये आणि रुबलमध्ये चलन विनिमय होईल. या नव्या प्रणालीच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात रशियाचे अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांशी भेट घेण्याची दाट शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha