Paytm : पेटीएमद्वारे (Paytm) रेल्वे (Indian Railway ) तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पेटीएमने आपल्या लाभधारकांसाठी एक विशेष सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना पैसे भरण्याची गरज भासणार नाही. तर प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतरही पैसे देता येणार आहेत. प्रवाशांसाठी ही नवी सुविधा आईआरसीटीसी ( IRCTC ) आणि पेटीएमच्या भागीदारीनंतर सुरू झाली आहे. 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' (Book Now Pay Later) असे या विशेष योजनेचे नाव आहे.


'आता बुक करा, नंतर पैसे द्या'  ही एक प्रकारची पोस्टपेड सेवा आहे. या सेवेद्वारे प्रवासी पैशाशिवाय रेल्वे तिकीट बुक करू शकतात. ज्या प्रवाशांकडे आरक्षण करताना पैसे नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा अधिक फायदेशीर आहे. अनेक वेळा असे घडते की एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे आरक्षणाची आवश्यकता असते. काही वेळा त्यावेळी पैसे नसतात. अशा परिस्थितीत पेटीएमची 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' ही सुविधा प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरेल.


'आता बुक करा, नंतर पैसे द्या' या सुविधेअंतर्गत प्रवाशांना तिकीट बुक केल्यानंतर पैसे जमा करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी मिळणार आहे. पेटीएम प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांचे बिल तयार करत असते. जेणेकरून ग्राहकांना हे समजू शकेल की महिन्यानंतर एकूण किती पैसे जमा करायचे आहेत. पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसचे सीईओ प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, पेटीएम ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन पावले उचलत आहे. या नवीन सुविधेमुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत.


'असे' बुक करा पेटीएमद्वारे रेल्वे तिकीट!
पेटीएमवर रेल्वे तिकीट बुक करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पेटीएमवर रेल्वे तिकीट बुकरण्यासाठी प्रथम तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर जा. यानंतर, खात्यात लॉग इन करा आणि तिकीटाची माहिती भरा. त्यानंतर पेटीएम पोस्टपेड ऑन पेमेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेटीएमवर लॉगिन केल्यानंतर ओटीपी टाका. यानंतर तुमचे तिकीट 'आता बुक करा, नंतर पैसे द्या'द्वारे बुक केले जाईल. 


महत्वाच्या बातम्या