एक्स्प्लोर
Advertisement
केरळमधील जलप्रलयानंतर आता आजारांचा धोका
अनेकांचे जीव वाचवण्यात तीनही दल आणि एनडीआरएफला यश आलं आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून याठिकाणी नागरिकांना काही आजार झाल्याचं समोर आलं आहे.
तिरुवअनंतपुरम : केरळमधील भीषण पूरस्थिती आता हळूहळू आटोक्यात येत आहे. यानंतर आणखी एका गोष्टीची भीती निर्माण झाली आहे. साडे तीनशेपेक्षा जास्त जीव घेतलेल्या पावसामुळे आता संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही बचावकार्य सुरु आहे. अनेकांचे जीव वाचवण्यात तीनही दल आणि एनडीआरएफला यश आलं आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून याठिकाणी नागरिकांना काही आजार झाल्याचं समोर आलं आहे.
पुरात अडकलेल्या नागरिकांना पुरेसे अन्न आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आता या ठिकाणहून तीन जणांना कांजिण्यांचा संसर्ग झाल्याने वेगळं ठेवण्यात आलं असल्याची माहिती आहे.
प्रदूषित पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी आहे. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
केंद्राकडून केरळला 500 कोटींची, तर महाराष्ट्राकडून 20 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. याशिवाय विविध राज्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक ठिकाणाहून जहाजाद्वारे तयार अन्नाची पाकिटं पाठवण्यात आली असून रेल्वेने पाणी पाठवण्यात आलं आहे.
20 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान : पिनराई विजयन
अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत 20 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. केरळमध्ये एनडीआरएफच्या 169 टीम काम करत आहेत. 22 हेलिकॉप्टर, नेव्हीच्या 40 बोटी, कोस्ट गार्डच्या 35 बोटींच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या शिवाय स्थानिक तरुण, पोलीस आणि मच्छिमारांचीही मदत मिळत आहे.
आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू
केरळमधील पुरात आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. मोठ-मोठी झाडं, टीव्ही, फ्रिज अशा अनेक गोष्टी रस्त्यावर, पुलावर वाहून आल्या आहेत.
पुरासोबतच केरळात इतर समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पदककुडी गावात महामार्गालगत सुरु असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनं बंद अवस्थेत असल्याने शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement