भारताची ताकद जगासमोर! कोरोना लसीचं काम पाहण्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादमध्ये दाखल
परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे परदेशी अधिकाऱ्यांचं पथक भारत-बायोटेक आणि बायोलॉजिकल-ई सारख्या कंपन्यांमधील लस उत्पादन क्षमता पाहणार आहेत. दोन्ही कंपन्या कोरोना साथीच्या विरूद्ध लसी तयार आणि उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
हैदराबाद : भारत लस निर्मिती आणि उत्पादन क्षमतेची ताकद सध्या जगाला दाखवत आहे. जगातील सुमारे 64 देशांतील राजदूत आणि ज्येष्ठ राजनयिक बुधवारी सकाळी हैदराबादला आले आहेत. कोरोना लस तयार करणार्या भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल-ई सारख्या स्वदेशी कंपन्यांमधील उत्पादनाची माहिती या सर्वांनी दिली जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे परदेशी अधिकाऱ्यांचं पथक भारत-बायोटेक आणि बायोलॉजिकल-ई सारख्या कंपन्यांमधील लस उत्पादन क्षमता पाहणार आहेत. दोन्ही कंपन्या कोरोना साथीच्या विरूद्ध लसी तयार आणि उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारत बायोटेकने कोवॅक्सीन नावाची लस विकसित केली आहे, तर ओहायो स्टेट इनोव्हेशन फंडने नवीन लसी तंत्रज्ञानामध्ये बायोलॉजिकल-ई कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.
बुधवारी सकाळी सर्व आमंत्रित राजनयिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने हैदराबादला नेण्यात आले. परदेशी राजदूतांची टीम भारतातील लसींची राजधानी असलेल्या हैदराबादमधील जिनोम वॅलीमध्ये आहे. याठिकाणी भारत-बायोटेक आणि बायोलॉजिकल-ईसह अनेक भारतीय कंपन्या आहेत तिथे हे सर्वजण भेट देतील. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्याच्या माध्यमातून भारताची लस उत्पादन क्षमता जगाला दाखवण्याचा हा प्रयत्न असेल. तसेच कोविड 19 लसींसाठी बाजारपेठ शोधण्याचा देखील प्रयत्न केला जाईल.
या देशांचे प्रतिनिधी भारतात आले
जगातील भिन्न भौगोलिक प्रदेशांचे प्रतिनिधित्व यामध्ये समाविष्ट केले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये अमेरिकी दूतावासातील आरोग्य प्रतिनिधींचा समावेश आहे. तर शेजारच्या देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, भूतान, बांगलादेश, मालदीव यांचा समावेश आहे. इराणचे सुद्धा प्रतिनिधा या दौऱ्यात आहेत. परंतु चीन आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींचा यात समावेश नाहीत.
या व्यतिरिक्त मध्य आशियातील किर्गिजस्तान आणि अझरबैजान हे देश देखील आहेत. युरोपमधील हंगेरी, आईसलँड, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक इ. आणि दक्षिणपूर्व आशियातील कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर यासह अनेक देश या दौऱ्यात आहेत. इथिओपिया, नायजेरिया, इजिप्त, चाड, नायजर व्यतिरिक्त आफ्रिकेतून बरेच देश आहेत. लॅटिन प्रदेशातही ब्राझील, मेक्सिको, अल सल्वाडोर, बोलिव्हियासारखे देश आहेत. पूर्व आशियातील दक्षिण कोरिया आणि दक्षिण विभागातील ऑस्ट्रेलिया या देशांचा या दौऱ्यात समावेश आहे.