वैष्णो देवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, 7 ठार 20 जखमी; पंतप्रधान मोदींकडून शोक
मिनीबसमधून प्रवासी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जात होते. या प्रवासादरम्यान रस्ते मार्गावर मिनी बस आणि समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाला.
हरयाणा : पंजामधील हरयाणाच्या अंबाला येथे गुरुवारी रात्री ट्रक आणि मिनी बसचा भीषण अपघात (Accident) झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या समारास ही भीषण घटना घडली. त्यामध्ये, 25 जण जखमी झाल्याची माहिती असून पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर, जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील प्रवासी मिनीबसमधून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जात होते. या प्रवासादरम्यान रस्ते मार्गावर मिनी बस आणि समोरुन येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये, मिनी बस चक्काचूर झाली असून 7 भाविक प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, या बसचा ड्रायव्हर दारु पिऊन बस चालवत होता, अपघातानंतर तो फरार झाल्याचं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी शिवानीने सांगितले. तसेच, बसमधून 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. रात्रीचा प्रवास असल्याने आमचा डोळा लागला होता, त्यामुळे नेमकी अपघाताची घटना कधी घडली हे समजलं नाही, असेही शिवानीने म्हटले आहे. दरम्यान, अपघात पहाटे उजाडतानाच्या सुमारास झाल्याची माहिती आहे.
हरियाणा के अंबाला में हुआ सड़क हादसा अत्यंत पीड़ादायक है। इस दुर्घटना में जिन्होंने अपनों को खोया है, उन शोकाकुल परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन पीड़ितों की हरसंभव…
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. हरयाणाच्या अंबाला येथील रस्ते अपघाताच्या घटनेनं अत्यंत दु:ख झालं आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या स्वकीयांना गमावलं, त्या सर्व शोकाकुल कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच, राज्य सरकारच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रशासना घटनास्थळावर मदतकार्यात सहभागी असल्याचंही मोदींनी म्हटलं.
हेही वाचा