एक्स्प्लोर
उपमुख्यमंत्री सिसोदियांच्या कार्यालयात चोरी, संगणक, cctvवर चोरांचा डल्ला
नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयावर चोरांनी डल्ला मारला आहे. चोरांनी कथित स्वरुपात संगणक, कागदपत्र आणि सीसीटीव्ही कॅमेर आणि डीव्हीआरसह इतर सामान लंपास केलं आहे.
पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही सामान ऑफिसच्या रिसेप्शनमधून चोरीला गेलं आहे. काल रात्री चोरी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान याप्रकरणी तपास सुरु आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, चोरांनी कार्यालयाचं कुलूप तोडून त्यांनी दोन संगणक, लेटर पॅड, हार्ड डिस्क, कागदपत्र, सीसीटीव्ही कॅमेरा, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरसह बरंच समान चोरलं आहे.
या कार्यालयाचे प्रभारी उपेंद्र यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चोरांनी कार्यालयात चोरी केली असून नेमकं काय-काय सामान चोरीला गेलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यालय काल उशीरा रात्री अडीच वाजता बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर ही चोरी झाली असावी.' अशी त्यांनी माहिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement