COVID 19 Cases In Delhi : राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडाफार दिलासा मिळाला असला तरी दैनंदिन रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. दिल्ली आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 27 हाजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 


दिल्ली आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत  27561 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.  दिल्लीतील संक्रमणचा दर तब्बल 26.22 टक्के इतका झालाय. मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 14 हजार 957 इतकी आहे.  दिल्लीत सध्या  87445 रुग्णावर उपचार सुरु आहेत.  राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 21259, सोमवारी 19166, रविवार   22751, शनिवारी 20181, शुक्रवार 17335 आणि गुरुवार 15097 नव्या रुग्णाची नोंद झाली होती. दरम्यान मुंबईमध्ये आज 16 हजार 420 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  




मुंबईत कोरोनाचा कहर कायम, नवे 16 हजार 420 कोरोनाबाधित -
मागील 24 तासांत आजही 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. या कोरोनारुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 420 झाली आहे. 


19 राज्यांत 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण -  
देशातील काही राज्यातील रुग्णसंख्यामध्ये मोठी वाढ होत आहे. त्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  येथील पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढतच आहे. देशातील 19 राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर चार राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या पाच हजार इतकी झाली आहे. पाच हजारांपेक्षा कमी अॅक्टिव रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या 13 इतकी आहे.  देशातील 300 जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा जास्त आहे. चार जानेवारी रोजी ही संख्या फक्त 78 इतकी होती. यावरुनच कोरोना विषाणूचा वेग समजू शकता.