Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नसून मागील दोन दिवस काहीशी आटोक्यात येणारी रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली आहे. मागील 24 तासांत आजही 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. या कोरोनारुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 420 झाली आहे. 

मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी -

तारीखमुंबईतील रुग्णसंख्या
24 डिसेंबर683
25 डिसेंबर757
26 डिसेंबर922
27 डिसेंबर809
28 डिसेंबर1377
29 डिसेंबर2510 
30 डिसेंबर3671
1 जानेवारी6347
2 जानेवारी8063
3 जानेवारी8082
4 जानेवारी10860
5 जानेवारी15166
6 जानेवारी20181
7 जानेवारी20971
8 जानेवारी20,318
9 जानेवारी19474
10 जानेवारी13,648
11 जानेवारी11,647
12 जानेवारी16,420

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha