एक्स्प्लोर
कोरेगाव भीमा संबंध : गौतम नवलखांची अटक चुकीची, त्यांची सुटका करा : दिल्ली हायकोर्ट
गौतम नवलाखा यांच्याप्रमाणे इतर आरोपींच्या केसेसही वेगवेगळ्या कोर्टात प्रलंबित आहेत त्यावर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणात गौतम नवलखा यांची अटक चुकीची ठरवत, त्यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेत. त्यामुळे गौतम नवलखा यांची नजरकैद आता संपणार आहे. यावेळी कोर्टाने पुणे पोलिसांची ट्रान्झिट रिमांडही रद्द केलीय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर स्वतःची पाठ थोपटणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आणि पुणे पोलिसांना झटका बसला आहे.
गौतम नवलखा यांना ज्या दिवशी अटक झाली, त्या दिवशी दिल्लीतल्या सत्र न्यायालयाने त्यांना ट्रान्झिट रिमांड ज्या पद्धतीने मंजूर केली होती, त्यावरही हायकोर्टानं प्रश्न उपस्थित केलेत.
केस डायरी मराठीत असताना, ती समजून घेण्याआधीच सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इतक्या लवकर पुणे पोलिसांवर विश्वास कसा ठेवला, असा सवाल हायकोर्टात उपस्थित करण्यात आला होता. दिल्ली हायकोर्टात हे अपील दाखल असतानाच सुप्रीम कोर्टाने त्यावेळी नवलाखा आणि इतर चार जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देऊन सुनावणी चालू ठेवली होती.
परवा सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर दिल्ली हायकोर्टात नवलाखा यांच्या वकिलांनी आता हायकोर्टाने आपला आदेश देण्याची विनंती केली.
चार आठवड्यांची नजरकैद केवळ आरोपींना कायदेशीर दाद मागण्यासाठी वेळ मिळावा यासाठीच आहे, त्यामुळे हायकोर्टानं आज आपला निर्णय देत त्यांची सुटका केली.
दरम्यान, गौतम नवलाखा यांच्याप्रमाणे इतर आरोपींच्या केसेसही वेगवेगळ्या कोर्टात प्रलंबित आहेत त्यावर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
31 डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 28 ऑगस्ट रोजी या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेत ज्यांना ठेवले, त्यात मजदूर संघाच्या नेत्या सुधा भारद्वाज, तेलुगू कवी वरवर राव, मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा, वरेनन गोंजाल्विस, गौतम नवलखा यांचा समावेश आहे. आता यातील गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
