एक्स्प्लोर

CBI नं बोलावलं, तेव्हा मी गेलेलो, पण ईडीचं समन्स बेकायदेशीर, त्यांना मला अटकच करायचंय : अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal: आम्ही भ्रष्टाचार केला असता तर, आम्हीही भाजपमध्ये गेलो असतो. त्यांचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत, कारण आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal on ED Summons: नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) ईडीनं (ED) तब्बल तीन समन्स धाडली, पण तरीही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) चौकशीसाठी हजर झाले नाहीत. अशातच काही आप (AAP) नेत्यांनी बुधवारपासूनच ईडीनं अरविंद केजरीवालांना अटक करण्याचा घाट घातल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील केजरीवालांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच ईडीनं पाठवलेल्या समन्सविरोधात आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 2 वर्षांत भाजपच्या (BJP) अनेक संस्थांनी छापे टाकले, मग एकही पैसा का मिळाला नाही? असा सवालही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. आप नेत्यांना जेलमध्ये टाकून आता मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ईडीनं कायदेशीर समन्स पाठवावं. कायदेशीर समन्सचंच पालन करेन, असंही केजरीवाल म्हणाले. 

ईडीनं पाठवलेलं समन्स बेकायदेशीर : अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "गुंडगिरी उघडपणे सुरू आहे. कोणालाही पकडा आणि तुरुंगात टाका, माझी सर्वात मोठी ताकद प्रामाणिकपणा आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना माझ्या प्रामाणिकपणाला धक्का लावायचा आहे. माझ्या वकिलांनी सांगितलं की, ईडीनं पाठवलेली सर्व समन्स बेकायदेशीर आहेत. हे बेकायदेशीर का आहेत, याची उत्तरं मी ईडीला दिली आहेत. त्यांनी योग्य समन्स पाठवलं तर मी तपासात सहकार्य करेन. भाजपचा उद्देश योग्य तपास करणं नसून, मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणं हा आहे. मला लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता येऊ नये म्हणून चौकशीच्या बहाण्यानं बोलावून मला अटक करण्याचा त्यांचा कट आहे."

भ्रष्टाचाराचा एक पैसाही सापडला नाही : केजरीवाल

अरविंद केजरीवाल म्हणाले की, "तुम्ही लोक दोन वर्षांपासून दारू घोटाळ्याचे नाव ऐकत आहात. मात्र आजपर्यंत या घोटाळ्यात एक पैसाही सापडलेला नाही. कारण कोणताही घोटाळा झाला नाही. असते तर पैसे मिळाले असते. खोटे आरोप करून भाजप मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखू इच्छित आहे."

आम्ही नेहमीच देशासाठी लढलोय : केजरीवाल 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, "सीबीआयनं 8 महिन्यांपूर्वी मला समन्स बजावलं होतं, मी गेलो होतो. पण ईडीचं समन्स बेकायदेशीर आहे. त्यांना चौकशीच्या बहाण्यानं मला अटक करायची आहे. ज्यांचं भाजपशी पटत नाही, त्यांना ते तुरुंगात पाठवतात. या कारणावरून त्यांनी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांनीही भाजपशी हातमिळवणी केली असती, तर ते तुरुंगाबाहेर गेले असते. जो त्याच्याशी हातमिळवणी करतो, तो प्रामाणिक होतो. या देशात जे काही चालू आहे ते धोकादायक आहे. आपल्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. आम्ही नेहमीच देशासाठी लढलोय."

भाजपला मला अटक करायचंय : अरविंद केजरीवाल 

"भ्रष्टाचार झाला नाही हे सत्य आहे. भाजपला मला अटक करायची आहे. माझी प्रामाणिकता ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि भाजपला त्याचंच नुकसान करायचं आहे. ईडीचं समन्स बेकायदेशीर असल्याचं माझ्या वकिलांनी मला सांगितलं. माझी चौकशी व्हावी, हा भाजपचा उद्देश नसून माझा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणं हा त्यांचा उद्देश आहे. त्यांना तपासाच्या नावाखाली फोन करून मला अटक करायची आहे.", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget