Delhi Teachers University : दिल्ली सरकारने शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षकांची एक विकसीत पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून दिल्लीत लवकरच 'शिक्षक विद्यापीठ' उभारण्यात येणार आहे. हे विद्यापीठ लवकरच तयार होईल, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दिली आहे. दिल्लीतील बक्करवाला गाव याठिकाणी शिक्षक विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. 5000 विद्यार्थ्यांच्या क्षमतेचं हे विद्यापीठ असणार आहे.
दिल्लीतील बक्करवाला गाव याठिकाणी 12 एकरच्या परिसरामध्ये या विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. 2022 पासून म्हणजे चालू वर्षापासून विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विद्यापीठाच्या कामाला गती देण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारण, यावर्षात हे विद्यापीठ सुरू करण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे. तसेच या विद्यापीठात चांगले आणि अनुभवी शिक्षक घेण्याचे काम देखील सध्या सुरू केले आहे. परदेशातील विद्यापीठांसोबत ज्या शिक्षकांनी काम केले आहे, त्या शिक्षकांना घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती देखील मनीष सिसोदिया यांनी दिली.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज विद्यापीठ
दिल्लीत उभा राहणार शिक्षक विद्यापीठ हे सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या विद्यापीठामध्ये लेक्चर हॉल, डिजिटल लॅब आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह लायब्ररी असणार आहे. या विद्यापीठाची इमारत ही चार मजली असमार आहे. मात्र यामध्ये दोन वेगवेगळे विभाग केले जाणार आहेत. ज्यामध्ये एक विभाग हा प्रशासकीय कामासाठी असेल आणि दुसरा विभाग हा शिक्षणासाठी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर, प्रशासकीय कार्यालय असमार आहे, तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वर्ग भरणार आहेत. 20 डिसेंबर 2021 ला दिल्ली मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्षक विद्यापीठाच्या स्थापनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली सरकार या विद्यापीठाच्या कामाला लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: