नवी दिल्ली :  सरकारी शाळांच्या मुद्द्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरात सरकारवर निशाणा साधलाय. गुजरातमधील अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षक नाहीत. तसेच पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये राजकीय नेत्यांच्या खाजगी शाळा आहेत. हे नेते त्यांच्या खाजगी शाळांमधून जनतेची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकारी शाळांमध्ये (Goverment school) चांगली व्यवस्था नसल्याने तेथील पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे सरकारी शाळा बंद पडण्याची वेळ आली असल्याचे केजरीवाल म्हणाले. 


दिल्लीत ज्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था ठिक करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये देखील आम आदमी पार्टी लोकांच्या साथीने सरकारी शिक्षणाची व्यवस्था सुधारण्यास मदत करेल. जेणेकरून गुजरातमधील मध्यमवर्गीय आणि गरिबांना चांगल दर्जेदार शिक्षण मिळेल असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत ज्याप्रमाणे शिक्षणात क्रांती झाली आहे, त्याचप्रमाणे गुजरातमध्येसुद्धा क्रांतीची गरज असल्याचे ते म्हणाले.


पंजाबमध्ये येणार आपचे सरकार?


पुढच्या काही महिन्यांमध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचण्यालाठी भाजप देखील कामाला लागलीय. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढच्या काही महिन्यात पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दुसऱ्या राजकीय पक्षांचे अनेक नेते आपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना  पक्षात स्थान देणार नसल्याचेही केजरीवाल यांनी ट्वीट करुन सांगितले आहे. पंजाबमध्ये आम्ही संपूर्ण स्वच्छ कारभार असणारे सरकार देणार असल्याचेही ते म्हणाले. आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी एका महिन्यात पंजाबमधूमन काँग्रेस सरकार जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.  सत्ता जाणार असल्यामुळे काँग्रेसचे काही नेते पंजाब लुटत आहेत. आम्ही कोणत्याही बेईमान नेत्यांना आपमध्ये प्रवेश देणार नसल्याचे मान म्हणाले होते. त्यांच्या या ट्वीटवर केजरीवाल यांनी वक्तव्य केले आहे.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha