Delhi Corona Update : दिल्लीत कोरोनाचा कहर, होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्येत सहा पटीने वाढ
कोरोनामुळे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 11 एप्रिलला 601 वरून आता 3,975 वर गेली आहे.
![Delhi Corona Update : दिल्लीत कोरोनाचा कहर, होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्येत सहा पटीने वाढ Delhi Corona Update Corona disaster in Delhi six times increase in home isolation patients Delhi Corona Update : दिल्लीत कोरोनाचा कहर, होम आयसोलेशनमधील रुग्णसंख्येत सहा पटीने वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/3db35735907364d0b6e538cf70eb8c0e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Corona News: राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानीमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीत होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सहा पटीने वाढली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिलपासून कोरोना रुग्णांची संख्या 447 होती. तर 24 एप्रिल ही संख्या 2,812 गेली आहे. 11 ते 24 एप्रिलच्या दरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्याची कोरोना संक्रमितांची संख्या 17 वरून 80 वर गेली आहे. दिल्लीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
गेल्या काही दिवसात दिल्लीतल कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 11 एप्रिलला 601 होती ती आता 3,975 वर गेली आहे. दरम्यान आकडेवारीनुसार रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे.
राजधानी दिल्लीत काल कोरोनाच्या 1083 रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 4.48 टक्के आहे. दिल्लीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3975 वर गेली आहे. तर 80 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मास्क अनिवार्य, दिल्ली सरकारचा निर्णय -
कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. जर आपण राजधानी दिल्लीमध्ये (National Capitol)आपल्या गाडीतून एकटे प्रवास करत असाल तर आपल्याला मास्क (Wearing Mask) घालणं आवश्यक नाही. मात्र दिल्ली (Delhi)मध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विना मास्क आढळणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून दिल्ली सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत. मात्र खाजगी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मात्र हे बंधनकारक नसेल.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)