Corona Update : भारताची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात मंगळवारी कोरोना विषाणू संसर्गाची 1,118 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर एका रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत संसर्गाचे प्रमाण सध्या तरी स्थिर आहे


आतापर्यंत एकूण 18,96,171 संसर्गाची प्रकरणे
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत एक दिवस आधी कोविड-19 साठी 25,528 नमुने तपासण्यात आले होते. त्यानुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,96,171 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहेत, तसेच या प्राणघातक विषाणूमुळे 26,183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिल्लीत 799 रुग्णांची नोंद करण्यात आली.


कोणत्याही प्रकारची लाट म्हणता येणार नाही


तूर्तास ही दिलासादायक बाब आहे की, तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉनचे सब-व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा अधिक भयावह आहे, परंतु तरीही संसर्ग दर आणि रुग्णांची संख्या स्थिर आहे. तज्ञांच्या मते, आजकाल कोरोना संसर्गाचा प्रभाव खूपच कमी आहे, जी रुग्णसंख्या समोर येत आहे, त्यात संक्रमित रुग्ण 2-3 दिवसात बरे होत आहेत. त्यामुळे याला कोणत्याही प्रकारची लाट म्हणता येणार नाही.


अनेक राज्यांमध्येही कोरोनाचा आलेख उंचावला
दुसरीकडे, संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्येही कोरोनाचा आलेख उंचावला आहे. सध्या देशभरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 19,637 वर पोहोचली आहे. याशिवाय, केवळ कोरोना संसर्गामुळे 5 लाख 24 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी, कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत, गेल्या 24 तासात 13 लाख 90 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले असून, त्यानंतर हा आकडा 1,90,50,86,706 वर पोहोचला आहे.


सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 844 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 292 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 153 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 18, रायगड 22 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1403 सक्रिय रुग्ण आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 223 रुग्णांची नोंद तर 161 रुग्ण कोरोनामुक्त


Shakib Al Hasan Positive for COVID-19: मोठी बातमी! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन कोरोना पॉझिटिव्ह


Rajesh Tope : आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे