Shakib Al Hasan Positive for COVID-19: क्रिडाविश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आलीय. बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) डॉक्टर मंजूर हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलीय. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. येत्या 15 मेपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच शाकिब अल हसन कोराना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचं म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळं त्याला श्रीलंकाविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. 


बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15- 19 मे दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 23-27 मे दरम्यान होणार आहे. शाकिब अल हसन बांगलादेशच्या संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. यातच त्याचं कोरोना पॉझिटिव्ह येणं बांगलादेशच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पहिल्या कसोटी सामन्यातून शाकिब अल हसनला मुकावं लागणार आहे. कोव्हिड प्रोटोकॉलनुसार त्याला पाच दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे. 



शाकिबची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
शाकिब अल हसननं आतापर्यंत 59 कसोटी, 221 एकदिवसीय आणि 96 कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 109 डावात त्यानं 39.50 च्या सरासरीनं 4 हजार 29 धावा केल्या आहेत. तर, 99 डावात 2.98 च्या इकॉनॉमी रेटनं 215 विकेट्स घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 37.73च्या सरासरीनं 6 हजार 755 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 22.44 च्या सरासरीनं 1 हजार 908  धावा केल्या आहेत आणि 6.67च्या इकॉनॉमी रेटनं 119 विकेट्स घेतल्या आहेत.


हे देखील वाचा-