National Technology Day 2022 : दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस. दरवर्षी याच दिवशी उत्साहात साजरा केला जातो. 

Continues below advertisement


1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञानातील (Technology) प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो. 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकाराचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या 'न्यूक्लियर क्लब' मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.







 


तसेच 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.


देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ (National Technology Day) म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.


महत्वाच्या बातम्या :