मुंबई: देशात जरी कोरोना रुग्णांची (CoronaVirus) संख्या वाढत असली तरी राज्यात मात्र त्या उलट चित्र आहे.  सोमवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात  वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज राज्यात 223 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर 161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू


राज्यात आज  दोन कोरोनाबाधित रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,370 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 8,04,22,318 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 78,79,622 इतकी झाली आहे.


राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1343 वर


राज्यातील सक्रिय (Active Patient) रुग्णसंख्या 1403 इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 844 रुग्ण हे मुंबईतील असून 153  रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत. 


एकीकडे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून मृत्यू घटले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे नवे 2 हजार 288 रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही मोठी घट आहे. 919 रुग्णांची घट झाली आहे. आदल्या दिवशी 3207 कोरोनाबाधितांची नोंद आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. देशात एकुण 4 कोटी 25 लाख 63 हजार 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 637 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबळींसह कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकुण संख्या 5 लाख 24 हजार 103 वर पोहोचली आहे.


संबंधित बातम्या


Shakib Al Hasan Positive for COVID-19: मोठी बातमी! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन कोरोना पॉझिटिव्ह


Rajesh Tope : आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे