पिंपरी चिंचवड : आरोग्य भरती परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं ही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झालंय.
आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होणार
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.
चौथ्या लाटेचे सूतोवाच नाही
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत माहिती दिली आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे सध्या कोरोनाची छोटी संख्या आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्याता आला आहे
नवनीत राणांचा एमआरआयचा फोटो टीआरपी वाढविण्यासाठी
सिटी स्कॅन, MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पद्धत मी आरोग्यमंत्री असताना कुठेही पाहिली नाही. या पद्धतीचे फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल हे पण चुकीचं आहे
किडनी रॅकेटचा निकाल लवकरच?
-पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आमच्याकडे त्यांचा सुनावणी सुरू आहे. आणखी आठ दिवस लागतील सगळ्या बाजूची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल