Building Collapsed: दिल्लीत 4 मजली इमारत पत्त्याच्या पानासारखी कोसळली; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
Mustafabad Building Collapsed: दिल्लीतील न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची भीती आहे.

Mustafabad Building Collapsed: दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शक्ती विहारमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला शुक्रवार आणि शनिवारी रात्री 2:50 वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. 40 हून अधिक जण बचावकार्य करत आहेत.
#WATCH | Delhi: 4 people died after a building collapsed in the Mustafabad area; rescue and search operation is underway
— ANI (@ANI) April 19, 2025
8-10 people are still feared trapped, said Sandeep Lamba, Additional DCP, North East District pic.twitter.com/qFGALhkPv3
विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, "आम्हाला मध्यरात्री 2:50 वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण इमारत कोसळल्याचं चित्र समोर होतं आणि ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची माहिती मिळाली. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत."
#WATCH | Delhi: Mustafabad building collapse caught on camera.
— ANI (@ANI) April 19, 2025
As per Delhi Police, "Among the 10 people who were taken out, 4 succumbed. Rescue operations still underway"
(Source - local resident) https://t.co/lXyDvOpZ3q pic.twitter.com/NlknYWODRR
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बाहेर काढण्यात आलेल्या 10 जणांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ईशान्य जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा म्हणाले की, ढिगाऱ्यात अजूनही 8 ते 10 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. चार मजली इमारतीत सुमारे 20 लोक राहत होते. इमारत कोसळण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्री 2:50 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली. ती चार मजली इमारत होती. माझे दोन पुतणे यामध्ये मी गमावले आहेत. माझी बहीण, भावजय आणि भाची देखील जखमी आहेत. त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मृतांपैकी एकाचे नातेवाईक असलेल्या शहजाद अहमद यांनी दिली आहे.
#WATCH | Latest visuals from the Mustafabad area of Delhi, where several people are feared trapped after a building collapsed today, early morning. Rescue operations underway. pic.twitter.com/X2sOUP9QLR
— ANI (@ANI) April 19, 2025























