एक्स्प्लोर
दिल्लीत कोचिंग सेंटरची निर्माणाधीन इमारत कोसळली; तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
दिल्लीत एक निर्माणाधीन कोचिंग सेंटरची इमारात कोसळली झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झालेत.
नवी दिल्ली : राजधानीत शनिवारी भजनपुरा येथे एक इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. तर, 13 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तीन विद्यार्थी अजूनही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. इमारतीत तासिका सुरू असताना हा अपघात झाला, ज्यामध्ये कोचिंग सेंटरच्या मालकाचादेखील मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
काही विद्यार्थी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आठ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाच्या प्रमुखाने दिली.
अरविंद केजरीवाल घटनास्थळी भेट देणार, तिवारी ने जताया दुख
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन याबद्दल दुःख व्यक्त केले. दरम्यान, थोड्याच वेळात ते घटनास्थळाला भेट देणार आहेत. ''भजनपुराहून वाईट बातमी आलीय. देव सर्वांना सुरक्षित ठेवो, मी लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.
पीडितांच्या दुःखात सहभागी - तिवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या घटनेसंबंधी ट्विट केलं आहे. ''भजनपुरा इमारत अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, यामुळे मी दुःखी झालोय, देव सर्वांच्या आत्म्यांना शांती दे, मी लवकरच भजनपुराला पोहचणार आहे, मी पीडितांच्या दुःखात सहभागी आहे, असं ट्विट तिवारी यांनी केलं आहे. Special Report | दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची एन्ट्री, सात उमेदवार रिंगणातभजनपुरा से बहुत बुरी खबर आ रही है। भगवान सब को सलामत रखे। थोड़ी देर में वहां पहुंचूंगा। https://t.co/LZojwG18b0
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 25, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement