एक्स्प्लोर
कोरोनोच्या संख्येत दिल्लीनं मुंबईला मागे टाकलं, पण...
देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वाधिक प्रभावी शहर ठरलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70, 390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69, 528 आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दिल्लीत याच काळात तब्बल 3788 इतके रुग्ण वाढले आहेत. अर्थात या दोन शहरांची तुलना करताना काही इतर घटकही लक्षात घेणं महत्वाचं आहे.
दिल्लीनं आत्तापर्यंत 4 लाख 20 हजार इतक्या टेस्ट केलेल्या आहेत, तर मुंबईत 2 लाख 94 हजार इतक्या टेस्ट झालेल्या आहेत. मुंबईत टेस्ट केलेल्या रुग्णांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण 23.2 टक्के तर दिल्लीत हे प्रमाण 16.7 टक्के आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 2365 आहे तर मुंबईत 3964 मृत्यू नोंदवले गेले आहेत. दिल्ली सरकारनं सर्व कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्याचा प्लॅन आखला आहे. 30 जूनपर्यंत हे स्क्रीनिंग पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानंतर कंटनेमेंट झोन वगळता शहराच्या इतर भागांमध्येही 6 जुलैपर्यंत स्क्रीनिंग केलं जाणार आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले आहेत. तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 57.42 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 86 हजार 514 इतके आहेत. गेल्या 24 तासात 13 हजार 012 रुग्ण बरे झाले झाले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 894 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 890 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 39 हजारांच्या पार गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 4 हजार 161 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 69 हजार 631 आहे. राज्यात काल 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement