एक्स्प्लोर

दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी! अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मोठा पराभव झाला आहे.

Delhi Assembly Election Results 2025 : देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मोठा पराभव झाला आहे. दिल्लीमधील विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. आज या निवडणुकीचा निकाला लागला. यामध्ये 48 हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. ते नेमकं काय म्हणाले होते? याबाबतची माहिती पाहुयात.

नेमकं काय म्हणाले होते अमित शाह?

दिल्लीत काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघात पराभूत होतील अशी भविष्यवाणी केली होती. अखेरी ती भविष्यवाणी आज खरी ठरली आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून कधी आघाडीवर कधी पिछाडीवर होते. मात्र, अकेर ते 1200 मतांनी पराभूत झाले आहे. अरविंद केजरीवाल यांचा परवेश शर्मा यांनी पराभव केला आहे. 

दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर काय म्हणाले अमित शाह?

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केलं आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला असल्याचे अमित शाह म्हणाले

केजरीवालांसह मनिष सिसोदियांचाही पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.

दिल्लीत भाजपला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठी एक नाव आघाडीवर आहे. अरविंद केजरीवालांचा ( Arvind Kejriwal) पराभव करणारे भाजप नेते परवेश वर्मा (Parvesh Verma) हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा मोठा पराभव केला आहे. हा आम आदमी पार्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार आहे. मात्र, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरु आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर प्रवेश वर्मा यांनी ट्वीटरवर जय श्री राम असं लिहिलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
Bangladesh New PM:  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी
Bangladesh New PM :  तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान, 25 जणांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी
Crime News: प्रेयसीवरती संशय; आधी खाऊ घातलं नंतर जीव घेतला अन् मृतदेहासोबत वारंवार..., मुंबईत जाऊन तिच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न, घटनेनं इंदौर हादरलं
प्रेयसीवरती संशय; आधी खाऊ घातलं नंतर जीव घेतला अन् मृतदेहासोबत वारंवार..., मुंबईत जाऊन तिच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न, घटनेनं इंदौर हादरलं

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
Embed widget