एक्स्प्लोर

Data protection Bill : डेटा प्रोटेक्शन विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांनी का केलाय विरोध? एडिटर्स गिल्डने व्यक्त केली चिंता

Data protection Bill : डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले.

Data protection Bill : लोकसभेत मणिपूर हिंसाचारच्या मुद्यावरून विरोधकांकडून गदारोळ सुरू असताना दुसरीकडे सोमवारी लोकसभेत वादग्रस्त डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 हे विधेयक  (The Digital Personal Data Protection Bill, 2023) मंजूर झाले. लोकसभेत विरोधकांनी गोपनीयता आणि इतर मुद्यांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतरही आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार, डेटा उल्लंघनासाठी  कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. विरोधकांनी विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सुचवलेल्या दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळण्यात आल्या. 

विधेयकात काय आहे?

केंद्र सरकारने भारतीय नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने 3 ऑगस्ट रोजी लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (DPDP) विधेयक सादर केले. यामध्ये व्यक्तींच्या डिजिटल डेटाचे संरक्षण किंवा गैरवापर करणाऱ्या संस्थांना 250 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. 

गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत नागरिकांचा डेटा गोळा करणे, संग्रहित करणे आणि वापरणे यासाठी इंटरनेट कंपन्या, मोबाइल अॅप्स आणि व्यावसायिक कंपन्यांना अधिक जबाबदार बनवणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना सांगितले की, गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, त्यानंतर डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकावर काम सुरू झाले.

सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मागे घेतले, जे पहिल्यांदा 2019 च्या उत्तरार्धात सादर केले गेले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये संशोधित मसुदा जारी केला. विरोधी पक्षाने ते विधेयक पुनरावलोकनासाठी संसदीय समितीकडे पाठवण्यास सांगितले होते. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक लोकसभेत मांडण्याची परवानगी मागितताच काँग्रेससह इतर विरोधी नेत्यांनी त्याला विरोध केला.

विरोधकांचा विरोध का?

लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह इतर विरोधी बाकांवरील खासदारांनी विधेयकाला विरोध केला. हे गोपनीयतेशी संबंधित असल्याने सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी घाई करू नये. या विधेयकाला संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. या विधेयकाच्या माध्यमातून सरकारला माहितीचा अधिकार पायदळी तुडवायचा आहे. त्यामुळे अशा उद्दिष्टाला आम्ही विरोध करू, असे विरोधकांनी म्हटले होते. 

एडिटर्स गिल्डने व्यक्त केली चिंता 

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानेदेखील विधेयकातील काही तरतुदींवर चिंता व्यक्त केली. या विधेयकामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ  शकते अशी भीती एडिटर्स गिल्डने व्यक्त केली. कायद्यातील काही कलमांतून पत्रकारांना विशेष सवलत न दिल्याने सार्वजनिक हितांसाठी वृत्तांकन करताना व्यक्तीगत डेटा संरक्षण अधिकारासोबत संघर्ष होऊ शकतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget