एक्स्प्लोर
आता रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून पेट्रोल, डिझेलचे नवे दर लागू

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत. पहिल्याच दिवशी या निर्णयाचा ग्राहकांना फायदा झाल्याचं दिसत आहे. कारण पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली आहे. विशेष म्हणजे यापुढे रात्री 12 नंतर पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची तुम्हाला सवय असेल तर ती सवयही आता मोडावी लागणार आहे. कारण आता रात्री 12 ऐवजी 6 पासून नवे दर लागू होतील. नवीन दरांनुसार पेट्रोलचे दर काय?
- दिल्ली - 66 रुपये 91 पैसे प्रति लिटर
- मुंबई – 78 रुपये 44 पैसे प्रति लिटर
- कोलकाता – 69 रुपये 52 पैसे प्रति लिटर
- चेन्नई – 69 रुपये 93 पैसे प्रति लिटर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























