एक्स्प्लोर

Cyclone Gulab : आंध्र-ओडिशाच्या किनारपट्टीला 'गुलाब' चक्रीवादळ धडकणार; रेड अलर्ट जारी

Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबरपर्यंत बंगाल, ओडिशा, मध्य आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी लहान-लहान चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आज संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकणार आहे. हे चक्रीवादळ 95 किमी तासी वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील किनारपट्टी क्षेत्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचे 'गुलाब' नाव हे पाकिस्तानने सुचवलं आहे. विशाखापट्टनम आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टनम या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 

भारतीय हवामान खात्याने या संबंधी रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचं तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मच्छिमारांना आज न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तौक्ते आणि यास या चक्रीवादळानंतर या वर्षी निर्माण होणारं गुलाब हे तिसरं चक्रीवादळ आहे. 

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबरपर्यंत बंगाल, ओडिशा, मध्य आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी लहान-लहान चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचसोबत विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा कोकण, मुंबई आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या ; 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget