एक्स्प्लोर

Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय'चा ट्रेलर, गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ

Cyclone Biporjoy Update : येत्या 24 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे.

Cyclone Biparjoy Landfall : देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) परिणाम पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर आहे. अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरात, महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहेय. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत. हा बिपरजॉय चक्रीवादळाचा ट्रेलर असल्याचं म्हटलं जात आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. किनारपट्टी भागातील सुमारे 30 हजार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार

हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. कच्छ भागात याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. 15 जूनला चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग किनाऱ्याजवळ 125-135 किमी प्रतितास असेल. सध्या अरबी समुद्रातील हे वादळ 8 किमी प्रतितास वेगाने जवळपास वायव्य दिशेकडे सरकत आहे.

पूर आणि नुकसानीची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी मोरबी, द्वारका, जामनगर, राजकोट, पोरबंदर येथे मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे पडू शकतात, कच्च्या घरांची पडझड होऊ शकते, पक्क्या घरांचंही नुकसान होऊ शकते, तसेच टेलिकॉम आणि रेल्वेच्या कामावरही परिणाम होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय'चं संकट! कुठे आणि केव्हा धडकणार, चक्रीवादळामुळे किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या सविस्तर...

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
Nepal PM Balen Shah India Visit : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल, नरेंद्र मोदींसाठी आणली खास 'ही' भेटवस्तू 
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल, नरेंद्र मोदींसाठी आणली खास 'ही' भेटवस्तू 
BJP OBC Morcha: भाजपकडून ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी; तर मुंबईसह महाराष्ट्रातून चौघांना संधी
भाजपकडून ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी; तर मुंबईसह महाराष्ट्रातून चौघांना संधी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
Embed widget