एक्स्प्लोर
गोव्यातील विमानतळावरुन सोन्याच्या पट्ट्या आणि बिस्किटं जप्त
गोव्यातील दाबोळी विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने दोन मोठ्या कारवाया केल्या. दोन्ही कारवयांमध्ये 24 लाख 20 हजार 500 रुपयांचं सोनं जप्त केलं.

पणजी (गोवा) : गोव्यातील दाबोळी विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने दोन मोठ्या कारवाया केल्या. दोन्ही कारवयांमध्ये 24 लाख 20 हजार 500 रुपयांचं सोनं जप्त केलं. मस्कत येथून ओमान एअरवेजच्या WY-209 या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या केरळमधील प्रवाशाकडे सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने सोन्याच्या पट्ट्या आढळल्या. या सोन्याच्या पट्ट्यांची किंमत 14 लाख 97 हजार 514 रुपये एवढी आहे. दुसऱ्या कारवाईत एअर इंडियाच्या विमानाने दुबई येथून गोव्यात आलेल्या केरळ येथील प्रवाशाकडे 9 लाख 22 हजार 986 रुपये किंमतीचे 348 ग्रामची सोन्याची बिस्किटे आढळून आली. दाबोळी विमानतळावरील या दोन्ही कारवाया गोवा सीमा शुल्क विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या नेतृत्त्वात झाल्या.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग























