एक्स्प्लोर

दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या तरुणांनी समर्पण करावं, अन्यथा आम्ही त्यांना सोडणार नाही : लष्कर

दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या तरुणांच्या पालकांनी आपल्या मुलांना समर्पण करण्यास सांगावं. जर त्यांना समर्पण केलं नाही तर आम्ही त्यांना ठार करू, असा इशारा कंवलजीत ढिल्लो यांनी दिला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जे तरुण दहशतवादाच्या मार्गावर आहेत, त्यांना घरी बोलवून घ्या, असं आवाहन भारतीय सैन्याच्या चिनार कोअरचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंह ढिल्लो यांनी जम्मू काश्मीरमधील पालकांना केलं. दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या तरुणांच्या पालकांनी आपल्या मुलांना समर्पण करण्यास सांगावं. जर त्यांनी समर्पण केलं नाही तर आम्ही त्यांना ठार करु, असा इशारा कंवलजीत ढिल्लो यांनी दिला आहे. 100 तासांच्या आत दहशतवाद्यांचा खात्मा केला : कंवलजीत सिंह ढिल्लो पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सर्वांनी पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 100 तासांच्या आत सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. मात्र पुलवामा हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि काय प्लानिंग होतं, याबाबतची माहिती देण्यास भारतीय सैन्याने नकार दिला. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यावर दया दाखवणार नाही : कंवलजीत सिंह ढिल्लो कंवलजीत सिंह ढिल्लो पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील पालकांनी आपल्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आणावं. जर असं झालं नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाही. दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवत आहोत. मात्र दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होणाऱ्यांवर दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही कंवलजीत सिंह ढिल्लो यांनी दिला. शहीदांच्या कुटुंबीयांनी एकटं समजू नये : कंवलजीत सिंह ढिल्लो शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकटं समजू नये. आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू. देशात विविध ठिकाणी अनेक काश्मिरी मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही हेल्पलाईल सुरु केली आहे, अशी माहिती कंवलजीत सिंह ढिल्लो  यावेळी दिली. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. व्हिडीओ सैन्यदल आणि सीआरपीएफची संयुक्त पत्रकार परिषद | UNCUT | नवी दिल्ली पुलवामा चकमकीतील शहीद मेजर विभूती शंकर यांना अखेरचा निरोप | देहराडून

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Embed widget