एक्स्प्लोर
तुमच्या घरी चहाला येईन, दिलेला शब्द सचिनने पाळला!

हैदराबाद : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी जगभरातील चाहते उतावीळ असतात. मात्र खुद्द सचिन स्वत:हून तुम्हाला भेटायला आला तर? आंध्र प्रदेशातील पुट्टमराजु कांडरिका गावच्या एका कुटुंबाला असाच अनुभव आला. त्यांच्या घरी चक्क क्रिकेटचा देव अवतरला. गोपालैया आणि विजयलक्ष्मी यांना तेव्हा धक्का बसला, जेव्हा 110 किमी अंतर कापून स्वत: सचिन तेंडुलकर त्यांच्या घरी चहा पिण्यासाठी आला. गुडालूर इथल्या घरी सचिनने भेट दिली. सचिनने 2014 मध्ये या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी तुमच्या घरी चहा प्यायला येईन, असं सचिनने सांगितलं होतं. ते वचन सचिनने पूर्ण केलं. सचिनने 2014 मध्ये हे गाव दत्तक घेतलं होतं. सचिनने या गावात सहा कोटीची विकासकामं केली आहेत. त्यानिमित्त सचिनने या गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान सचिनने गोपालैया आणि विजयलक्ष्मी यांच्या घरी जाऊन चहा घेतला. संबंधित बातम्या
सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलं आंध्र प्रदेशातील गाव
गावाचा विकास पाहून फार समाधान वाटलं: सचिन
आणखी वाचा























