Covid19 : कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णही घटले, देशात 5383 हजार कोरोनाबाधित, 20 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात नवीन कोरोनाबाधितांसह सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. देशात 5383 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी आहे. देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा घटला आहे. देशात 5383 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या आधीच्या दिवसापेक्षा 60 अंकांनी कमी आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कारण अवघ्या काही दिवसांवर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आहे. कोरोनाचा आलेख घटताना दिसतोय. त्यामुळे यंदा सण आणि उत्सव जोरदार उत्साहात साजरे होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 217 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या 1,061 ने घटली
देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 383 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 45 हजार 281 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 1,061 ने घटली आहे. काल देशात 46 हजार 342 उपचाराधीन कोरोना रुग्ण होते.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के
आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 424 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के इतके असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट 1.68 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 5 लाख 28 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतही कोरोना रुग्ण घटले
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,776 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या