Covid19 Vaccine : जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच देश लसीकरणावर (Corona Vaccination)अधिक भर देत आहेत. अमेरिकेत आता पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेत लवकरच 5 वर्षांच्या लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येईल. या लसीकरण मोहिमेअंतर्गत मॉडर्ना (Moderna) आणि फायजर (Pfizer) या लसींचा वापर केला जाईल. अमेरिकन नियामक मंडळानं लसीकरण मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणाला शुक्रवारी परवानगी दिली आहे. यानुसार पुढील आठवड्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतचे सुमारे 18 दशलक्ष लहान मुलं आहेत.


अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA) शिफारस करण्याआधी त्यांच्या सहसल्लागार समितीनं मॉडर्ना आणि फायजर लसींच्या लसीकरणाला मंजुरी दिली होती. अमेरिकेत प्रौधासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांच्या लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली. देशात पाच वर्षापर्यंतच्या वयोगटातील अंदाजे 18 दशलक्ष मुलं आहेत.


मॉडर्ना आणि फायजर लसींना परवानगी
अन्न आणि औषध प्रशासनानं शाळकरी मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी मॉडर्नाची लसीला देखील मंजूरी दिली आहे. यापूर्वी या मुलांसाठी फक्त फायझर लसीला परवानगी होती. FDA च्या शिफारशीनुसार पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसीकरणाला आता फक्त रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (CDC) मंजुरी आवश्यक आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे (CDC) सल्लागार तज्ज्ञांकडून शनिवारी निकाल देतील. CDCचे संचालक डॉ. रोशेल वॉलेन्स्की अंतिम मंजुरी देतील.


राज्यांकडूनही ऑर्डर देण्यात आल्या आहेत
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासन गेल्या अनेक आठवड्यांपासून मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्याची तयारी करत आहे. राज्यांनी लसींचा पुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मान्यता मिळाल्यास सोमवार किंवा मंगळवारपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या