Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग कमी व्हायचं नाव घेत नाही. कोरोनाचा कहर संपला असं वाटत असताना आता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात कोरोना महामारी सुर झाल्यास आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.


सलग तीन दिवस महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चार हजारापार


महाराष्ट्रात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसापासून रुग्णसंख्या ही चार हजारपार जात आहे. शुक्रवारी राज्यात 4165 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 2255 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.


दिल्लीत 1797 नवीन कोरोनाबाधित
नव्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत 1795 नवीन कोरोना रुग्ण आणि एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना संक्रमणात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


बंगालमध्ये कोरोनाचे 295 नवीन रुग्ण


पश्चिम बंगालमधील 295 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बंगालमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या 232 ने वाढून 1406 वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 11 हजार 258 हून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे


ओडिशात 25 जणांना कोरोनाचा संसर्ग


ओडिशात शुक्रवारी 25 नवीन कोरोनाच्या रुग्णांती नोंद झाली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना मृतांची संख्या 9126 वर कायम आहे.