Covid Scare in Parliament : देशभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉनचाही प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. आता कोरोनानं संसदेतही (Parliament) शिरकाव केला आहे. संसद भवनातील 400 हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं समोर आलं आहे. 


देशाच्या राजधानीचं शहर असेलल्या दिल्लीमध्ये शनिवारी कोरोनाच्या 20181 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी गेल्या आठ महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. यापूर्वी 5 मे रोजी एका दिवसात सर्वाधिक 20,960 रुग्ण आढळून आले होते. नवीन रुग्णांमुळे राष्ट्रीय राजधानीत एकूण बाधितांची संख्या 5,26,979 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 25,143 वर पोहोचली आहे.


दिल्लीत कोविड संसर्गाचा दर 19.60 टक्क्यांवर गेला आहे. जो गेल्या आठ महिन्यांतील उच्चांक आहे. दिल्ली आरोग्य विभागाच्या मते, गेल्या वर्षी 9 मे रोजी शहरांतील पॉझिटिव्हीटी दर 21.66 टक्के नोंदवला गेला होता. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 48,178 वर पोहोचली आहे. जी 18 मेनंतरची सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये गेल्या वर्षी 18 मे रोजी सर्वाधिक 50,163 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


तिसरी लाट धडकली? जानेवारीच्या अखेरीस दिवसागणिक 10 लाख रुग्ण?


देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. अशातच आता एका नव्या दाव्याने खळबळ माजली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येईल आणि भारतात दर दिवसाचा 10 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळतील, असा दावा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (IISc-ISI) मधील संशोधकांकडून करण्यात आला आहे. यानुसार, जानेवारी महिन्यामध्ये देशात दररोज 10 लाखांहून अधिक कोरोनारुग्ण आढळण्याची शक्यता आहे. तर, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची जेव्हा तिसरी लाट त्याच्या शिखरावर पोहोचेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह