Covid 19 3rd Wave : देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. अशातच आता एका नव्या दाव्याने खळबळ माजली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येईल आणि भारतात दर दिवसाचा 10 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळतील, असा दावा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (IISc-ISI) मधील संशोधकांकडून करण्यात आला आहे. यानुसार, जानेवारी महिन्यामध्ये देशात दररोज 10 लाखांहून अधिक कोरोनारुग्ण आढळण्याची शक्यता आहे. तर, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची जेव्हा तिसरी लाट त्याच्या शिखरावर पोहोचेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


शास्त्रज्ञ शिवा अथ्रेया, शास्त्रज्ञ राजेश सुंदरेसन आणि बंगळुरूमधील IISc-ISI येथील सेंटर फॉर नेटवर्क्ड इंटेलिजन्सच्या टीमचे 'प्रोजेक्शन्स जानेवारी-मार्च 2022 IISc-ISI मॉडेल'मध्ये, जानेवारी महिन्याच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाची 10 लाख प्रकरणे समोर येतील, असंही सांगण्यात आलं आहे.


तिसर्‍या लाटेची दाहकता प्रत्येक राज्यांसाठी वेगळी असेल आणि भारतासाठी कोरोना महामारीचं चक्र मार्च महिन्यापर्यंत आटोक्यात येऊ शकेल. या मॉडेलनुसार,  "मागील संसर्ग, लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे लोकसंख्येचा काही भाग नवीन प्रकारासाठी संवेदनाक्षम होतो," 


मॉडेल तिसऱ्या लाटेच्या संवेदनशीलतेचे तीन स्तरांवर विभाजन करते - 30 टक्के, 60 टक्के आणि 100 टक्के. 30 टक्के अतिसंवेदनशीलतेच्या निकषांतर्गत, भारतात दररोज तीन लाख रुग्ण, 60 टक्के संवेदनशीलतेच्या खाली दररोज सहा लाख रुग्ण आणि 100 टक्के अतिसंवेदनशीलतेवर 10 लाख प्रकरणे दिसू शकतात.


तिसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसू शकतो, दैनंदिन 1,75,000 हून कोरोनारुग्ण आढळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात, आयआयटी कानपूर (IIT-K) च्या संशोधकांनीही भाकीत केले होते की, भारतात 3 फेब्रुवारीपर्यंत कोविड-19 महामारीची तिसरी लाट येऊ शकते.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA