Chitra Ramkrishna : चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी
Chitra Ramakrishna in judicial Custody : दिल्ली न्यायालयाने चित्रा रामकृष्ण यांना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती, यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Chitra Ramkrishna : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना दिल्ली न्यायालयाने आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना 7 मार्च रोजी सात दिवसांची सीबीआय कस्टडी सुनावण्यात आली होती. ज्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चित्रा यांना 6 मार्च रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 7 मार्च रोजी त्यांची चौकशी करण्याकरता सात दिवसांची सीबीआय कस्टडी सुनावली होती. ज्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयातील एका कथित योगीच्या सूचनेवरून काम करणे आणि संवेदनशील माहिती देण्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान दिल्ली न्यायालयात सोमवारी विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी सीबीआय आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला. या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) NSE घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवस चित्रा यांना सीबीआय कस्टडी सुनावण्यात आली आहे.
सीबीआयने काही दिवसांपूर्वी एनएसईचे माज ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून अटक केली होती. हिमालयातील योगी हा दुसरा कोणी नसून आनंद सुब्रम्हण्यम आहे, असे म्हटले जात आहे. एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आनंदवर आहे. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण या आनंदच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत होत्या. सध्या आनंद सुब्रम्हण्यम सीबीआय कोठडीत आहे.
काय आहे प्रकरण ?
चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.
केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.
सेबीने NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या:
- देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेत होते हिमालयातील योगीबाबा, सीईओ चित्रा रामकृष्ण अडकल्या वादात
- NSE CASE: चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून लुकआउट परिपत्रक जारी
- Tata Sons: टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांना पाच वर्षांची मुदतवाढ; कार्यकारी मंडळाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha