एक्स्प्लोर
तिला साडी गिफ्ट कर, घटस्फोट नको, कोर्टाकडून समेट
![तिला साडी गिफ्ट कर, घटस्फोट नको, कोर्टाकडून समेट Court Ordered A Man To Gift Wife Saree To Save Marriage तिला साडी गिफ्ट कर, घटस्फोट नको, कोर्टाकडून समेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/21090039/Court-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भोपाळ : घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आलेल्या दाम्पत्याचा न्यायाधीशांनी समेट घडवून आणला आहे. पत्नीला साडी गिफ्ट करण्याचा सल्ला देत जजने पती-पत्नीला घटस्फोट घेण्यापासून परावृत्त केलं आहे.
मध्य प्रदेशच्या खरगौव जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. संजू आणि रानू यांच्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात प्रलंबित होतं. पतीचं दुर्लक्ष आणि एकटेपणातून तिने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्याचं न्यायाधीशांच्या लक्षात आलं.
जस्टिस दुबे यांनी पती संजूला बायकोला शॉपिंगसाठी नेण्याचे आदेश दिले. तिला साडी घे, खुश ठेव असं सांगत दोघांमध्ये समेट घडवून आणला. 'महिला दिवसभर काम करतात, घर सांभाळतात, अशावेळी त्यांना आपली काळजी घेणारं कोणी असावं, असं वाटणं साहजिक आहे.' असंही कोर्टाने म्हटलं.
कोर्टात फिल्मी सीन
कोर्टाच्या आदेशानुसार संजूने पत्नीसाठी साडी खरेदी केली. 'तू खूप सुंदर आहेस, जेव्हा तू ही साडी नेसशील आणखी सुंदर दिसशील' अशा शब्दांत त्यांनी पत्नीचं कौतुक केलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)