Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील चाचणीत भारत बायोटेकची कोवॅक्सिन सुरक्षित
Bharat Biotech COVAXIN Update : भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीची चाचणी केली जात आहे. या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे.
मुंबई : कोरोनाची लस विकसित करणारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस सुरक्षित आहे. कोवॅक्सिनवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी ही माहिती दिली.
भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बेळगावात या लसीची चाचणी सुरु आहे.
कोरोना व्हायरसवर स्वदेशी लस तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत वेगाने पावलं टाकत आहे. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाच्या लसीची सहा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे.
देशाच्या कामी येतोय, सैनिकासारखं वाटतंय; कोवॅक्सिन लसीची चाचणी घेणाऱ्या स्वयंसेवकांची भावना
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचं 12 शहरांमध्ये परीक्षण केलं जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे.
पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्सिनवर संशोधन करणाऱ्या सविता वर्मा म्हणाल्या की, "कोवॅक्सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचं निदर्शनास आलं आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही. संबंधित बातम्या Corona Vaccine | कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी भारतातील 'या' कंपन्यांचे प्रयत्न; कधीपर्यंत येण्याची शक्यता? बीसीजी लसीची चाचणीही तिसऱ्या टप्प्यात; पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये क्लिनिकल ट्रायल Corona Vaccine | भारत बायोटेक-आयसीएमआरच्या Covaxin लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी