एक्स्प्लोर

Coronavirus | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4200 पार; आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू

भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4200 पार पोहोचला आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत.

देशात COVID-19 मुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या रूग्णांचे आकडे सर्वांसमोर जाहीर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 63 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. तर 30 टक्के मृत्यू हे 40 ते 60 दरम्यान वय असणाऱ्या लोकांचे झाले आहेत. तर 7 टक्के कोरोनाग्रस्त हे 40 पेक्षा कमी वयाचे आहेत.

आयसीएमआर ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरससाठी 5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आली आहे. 8-9 एप्रिलला 2.5 लाख किट डिलिव्हर होणार आहेत.

पाहा राज्यानुसार कोरोना बाधितांचा आकडा

Coronavirus | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4200 पार; आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू

Coronavirus | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4200 पार; आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू

तब्लिगींच्या संपर्कातील 25 हजार लोक क्वॉरंटाईन

गृह मंत्रालयाने तब्लिगी जमातीच्या लोकांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयातील संयुक्त सचिव श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'आम्ही 25000 पेक्षा जास्त तब्लिगी जमातीच्या लोकांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन केलं आहे. हरियाणाच्या ज्या 5 गावांमध्ये ते गेले होते. ते सील करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ : मातोश्रीजवळील चहावाल्याला कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे 170 सुरक्षारक्षक बदलणार

राज्यांना आर्थिक मदत आणि अन्नधान्यांचा पुरवठा

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, राज्यांसाठी नॅशनल हेल्थ मिशन फंड्समधून 1100 कोटी रूपये जारी करण्यात आले आहेत. तसेच 3000 कोटी रूपयांचा अॅडिशनल फंडही जारी करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये भारतीय रेल्वे ने दिलेल्या योगदानाबाबत खरचं कौतुक आहे. त्यांनी सांगितलं की, 13 दिवसांमध्ये रेल्वेने 1340 कोचमधून वस्तूंचा पुरवठा केला आहे. रेल्वेमार्फत संपूर्ण देशामध्ये 16.94 मॅट्रिक टन अन्नधान्य ट्रान्सपोर्ट करण्यात आलं आहे. 13 राज्यांना 1.3 लाख मेट्रिक टन गहू आणि 8 राज्यांना 1.32 लाख मेट्रिक टन तांदूळ देण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे नवे रूग्ण

दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचे 523 रूग्ण आहेत. आतापर्यंत 523 रूग्णांपैकी 330 रूग्ण मरकजचे आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने 1 लाख टेस्टिंग किट्स ऑर्डर केले आहेत. हे किट्स शुक्रवारी मिळणार आहेत. केंद्र सरकारद्वारे दिल्लीला 27000 व्यक्तिगत सुरक्षा किट्स (PPE) मागवले आहेत.

महाराष्ट्रातही कोरोनाचं सावट

राज्यात सोमवारी कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 868 वर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 7 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 4 जण मुंबईतील, प्रत्येकी 1 जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात; दोन वर्षे निधीही नाही

पत्रकार, अँकर्सला जीवे मारण्याची धमकी; NBA कडून कारवाईची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget